प्रेमाची एक वेगळी भाषा आणि संदर्भ असतात , हे प्रेमाच्या... टप्प्यावरून
गेल्यावरच समजतं. काहींच्या मते, ही भाषा डोळ्यांनी व्यक्त होऊन मनाला समजते,
तर काहींच्या मते, चेह-यावरील हावभाव पुरेसे असतात. प्रत्येकाची प्रेम व्यक्त
करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण तरीही जगभरातील प्रेमात काही गोष्टी कॉमन
असतात. तुम्ही कुणावर प्रेम केलं असेल तर थोडासा विचार करा. ही लव्हॉलॉजीची
एबीसीडी कळतनकळत तुम्हालाही परिचयाची झाली असेल.
'ए' : अँट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण
प्रेमाची सुरुवात त्याच्या / तिच्याकडे आकषिर्त झाल्यामुळे होते, हे वेगळं
सांगायची गरज आहे का.....?
'बी' : बॅचलर
ही डिग्री गमावून बसण्याच्या प्रक्रियेला प्रेमानेच तर सुरुवात होते. काहींच्या
आयुष्यात हा क्षण वारंवार येतो, तर काहींच्या आयुष्यात हा योग लग्नानंतरच येतो.
'सी' : क्यूट
तो / ती प्रत्येक क्षणी क्यूट वाटायला लागली की तुम्हाला प्रेमाचा फिवर चढलाच
समजा.
'डी' : डिच म्हणजेच फसवणं
प्रेमात कुणी दुस- याला डीच केलं तर त्या व्यक्तीने कधीच तिच्यावर प्रेम केलं
नव्हतं, असं समजावं.
'ई' : इगरनेस म्हणजेच तीव्र इच्छा
भेटणं, पाहणं, बोलणं अशा त्या दोघांच्या प्रत्येक हालचालीत प्रेमाची तीव्र
इच्छा दडलेली असते.
'एफ' : फ्लावर अर्थातच फुलं
प्रपोज करायचंय, राग घालवायचाय, खुश करायचंय, सरप्राइज द्यायचंय... तुम्हाला
काय करायचं, हा पेच पडला की छानशी फुलं विकत घ्यायची. अर्धा प्रॉब्लेम तिथेच
सोडवता येतो.
'जी' : गिफ्ट
हल्ली गिफ्ट हे प्रेम मोजण्याचं उत्तम परिमाण झालं आहे. त्यातील दिखाऊपणाचा भाग
वगळला तर हा प्रेम व्यक्त करण्याचा एक चांगला पर्याय होऊ शकतो.
'एच' : हॉट
फिलिंग हॉट, हॉट, हॉट..... प्रेमातील एक हॉट फिलिंग काही काळानंतर
पर्सनॅलिटीमधूनही दिसून येतं. त्याला / तिला आवडेल म्हणून खूप छान म्हणजे
आजच्या भाषेत हॉट दिसण्याचा प्रयत्न केला जातो.
'आय' : इलू
'सौदागर' चित्रपटाने काय दिलं, असं विचारलं तर इतका कठीण प्रश्न का विचारता,
असा प्रतिप्रश्न विचारला जाईल. 'आय लव्ह यू' चा शॉटफॉर्म यातून प्रसिद्ध झाला.
आज एसएमएस करताना या शॉर्ट आणि स्वीट शब्दाचा वापर केला जातो.
'जे' : जेलस म्हणजेच मत्सर
तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल, यावरून जेलसीची तीव्रता लक्षात येते.
प्रेमात पडल्यावर आपल्या मनात मत्सर भावना दडली आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहत
नाही.
'के' : किस्स
कधीही न विसरता येणारे ते नाजूक क्षण, हवासा वाटणारा मउ सुत ओठांचा स्पर्श.
'एल' : लव्ह म्हणजेच प्रेम
लव्हॉलॉजी विषयाचा पाया याच संकल्पनेने रचला गेला आहे. जगातील संपूर्ण
साहित्यात याची परिपूर्ण व्याख्या मिळणं कठीण, यावरून या शब्दाची व्याप्ती
तुम्हाला कळू शकते.
'एम' : मनी म्हणजेच पैसा
प्रेमाने पोट भरत नाही, हे कळण्याचा टप्पा आणि त्यावरचं उत्तर म्हणजे पैसा.
'एन' : नॉटी म्हणजेच खोडकर
माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे-... हे खूपचं बोअरिंग वाटतं ना....? इथेच या
नात्यात थट्टा-मस्करीचा प्रवेश होतो. पण हे जरा जपून.
'ओ' : ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी
उम्मीद पर ही दुनिया कायम है..... असं प्रेमात पडल्यावर वारंवार बोलावं लागतं.
ती आपला निर्णय घरी कळवते, तुम्ही पहिल्यांदा तिच्या घरी जाता असा प्रसंग वेगळा
असतो, पण मदतीला येणारा आशावाद तोच असतो .
'पी' : फिजिक्स
हल्ली फिजिकल केमिस्ट्री, गेटिंग फिजिकल असे शब्द वापरले जातात. शारीरिक आकर्षण
हे त्याचं मूळ आहे. पण हा मुद्दा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
'क्यू': क्वीन
तिला कायम राणीसारखं मानावं लागतं. तिच्या कोणत्याही इच्छेचा अवमान केलेला चालत
नाही. शेवटी तिला तुमच्या हृदयाचं सम्राज्ञीपद द्यावंच लागतं, प्रेमातील ही एक
अपरिहार्य गोष्ट आहे.
'आर' : रोमान्स म्हणजेच अद्भुत किंवा रम्य अनुभव
रोमॅण्टिक व्यक्तींना त्यांच्या नातेसंबंधात प्रेमाचे रम्य रंग भरण्यासाठी खास
प्रयत्न करावे लागत नाही, तर काहींच्या आयुष्यात नियोजन करूनही असं रोमॅण्टिक
घडत नाही. लक फॅक्टर इथे मोठी भूमिका बजावतो.
'एस' : स्वीट
प्रेमात पडल्यावर प्रत्येक गोष्टीला स्वीट हा शब्द जोडायला विसरायचं नाही.
प्रेमात हार्ट, ड्रीम्स हे सगळं न सांगता स्वीट होऊन जातं.
'टी' : टॉलरन्स म्हणजेच सहनशक्ती
प्रेम आणि सहनशक्ती असे एकाच नाण्याचे दोन पैलू असतात, हे अनुभवावरून लक्षात
येईल. इथे तुम्ही कळत नकळत दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी स्वीकारलेली असते.
त्यामुळे जितकी सहनशक्ती तुमच्याकडे जास्त तितका प्रेमाची गोडी अधिक वाढते.
'यू' : 'US' म्हणजेच आम्ही
प्रेम निव्वळ स्वत:चा विचार करणारी संकुचित विचारसरणी सोडायला भाग पाडतं. हीच
प्रेमाची जादू असेल.
'व्ही' : व्हीक्टरी म्हणजेच जिंकणं
तिचं / त्याचं हृदय जिंकणं.... हे तुम्ही हृदय हरल्याशिवाय शक्य होत नाही. हा
अजब व्यवहार इथे आवडीने करावा लागतो.
'डब्ल्यू' : विल म्हणजेच इच्छाशक्ती
प्रेमात खूप काही सिद्ध करून दाखवावं लागतं . त्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी
तुम्हाला इच्छाशक्तीतून मिळते.
'एक्स' : एक्स (ex) - बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्ड
हे अक्षर आधीच्या प्रेमातील नात्यांचं वर्णन करताना मदतीला धावून येतं.
'वाय' : यंग
तुम्ही यंग हार्ट असाल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेमात पडण्याचं दिव्य
करता येतं.
'झेड' : झील म्हणजेच आस्था
तो दूर का असेना, पण सुखात असावा. ती कुठेही राहो, खूष राहावी. ही आस्थाच त्या
प्रेमवेड्या दोन जीवांना जपत असते.See More
कोणी तरी बोललेच आहे "प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं same असतं"....
No comments:
Post a Comment