Monday, 23 May 2011

मैत्री

मित्रच मित्राची थट्टा करणार
मित्रच मित्राची मस्करी करणार
थट्टा-मस्करीशिवाय मैत्रीत अर्थच
नाही उरणार
मित्रच मित्राला सावरणार
मित्रच मित्राला दिलासा देणार
चुकीच्या वाटेने जाताना मित्रच
मित्राला अडवणार
सुख-दु:खात भागीदार होणार
यशापयशाचा साक्षीदार होणार
अपयशाने खचुन जाताच मित्रच
मित्राला आधार देणार
मित्रच मित्रावर रागावणार
मित्रच मित्राची विनवणी करणार
कितीही राग आला तरी मित्रच
मित्राशी बोलायला जाणार
संकटात मित्राची आठवण येणार
आनंदात मित्राची उणिव भासणार
ख-याखु-या जिवलग मैत्रीत
क्षणाक्षणाला वाढच होणार
अबोल राहीलो आपण असे
तर मैत्रीत कशी वाढ होणार ?
विचार करुन सांग थोडा
तु माझ्याशी कधी बोलणार ?
--
Warm Regards
Umesh Mahadik

No comments:

Post a Comment