Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Thursday, 7 July 2011

नजरेत जे सामर्थ्य आहे

नजरेत जे सामर्थ्य आहे 

ते शब्दांना कसे कळणार ? 

पण प्रेमात पडल्याशिवाय 

ते तुम्हाला कसे कळणार ?

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा

काहीतरी देण्यात महत्त्व असतं

कारण मागीतेला स्वार्थ

अन् दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधीतरी माझी चौकशी केली होती

मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती ....v

आज अचानक भल्या पहाटे

"आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकले
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकले

प्रेमाचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या क्षणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या क्षणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"

आई गं...आई गं

आई गं...आई गं...... बछड्यासाठी धाव गं....... तुरुंगात मी माणसांच्या, घे मजकडे तु धाव गं....... खेळण्यास मी आलो होतो, हिरव्या गवता येथ भुलुनी.... मान पकडली या लोकांनी, हिरवा पाला मज दावुनी....... आण कुणा मज सोडविण्या, ओरड्तोय मी फ़ार फ़ार गं...... बुभुक्षित हे मानव जमले, करण्या मजला ठार गं....... आई...आई...ये ना गं, मम्मे..खम्मे....ये ना लवकर सांग ना कसायास या, बघ बांधतो खुंट्यास कसा...... बाळ तुझा चिमुकला आज, बघ धडपडतोय आज असा........ कोवळ्या बाळास खाण्या, जमाव अगदी निर्लज्ज आहे....... खवखवलेला सुरा कधीचा, कापण्यास कसा सज्ज आहे....... आई नको वाचवुस मजला, बस्स पाहीन तुला अखेरी...... दादास पण सांगुच नको, अंत असा माझा अघोरी....... आताच तर आलो ना गं. मग बोलावतो देव का गं........ मारल्या हाका जेथुनी मी, कापणार ही मान का गं....... आई...आई ये गं....ये गं, तो जवळ माझ्या येतोय..... आतातरी सोडव ना गं मला, तो प्राण हिरावुन नेतोय........ मम्मी.....आई......आई.....आई, दाबली ही मान माझी...... डोळ्यात तुला आठवतोय गं...... आ..... ---संतोष

"माझ्यावर कविता कर ना"

ती नेहमीच म्हणायची "माझ्यावर कविता कर ना",
मला तेव्हा कळायचे नाही नक्की काय आणि कशी कविता करू ते.कारण आमची मैत्री ही फेसबुक मधली त्यामुळे फक्त सेलवर जे बोलणे होयचे तेव्हडेच मी तिला ओळखत होतो.
तिला सारखा मी सांगायचो " कविता करू कशी, अशी होत नाही कविता त्यासाठी तुला पूर्ण जाणून घेयला हवे".
ती म्हणायची "माझा फोटो पाहून कर ना तेव्हा तर जमेल ना"

मी म्हणायचो " कशी होणार ग फोटोत तुझा नेहमी एकाच भाव असतो प्रसन्न, त्याशिवाय दुसरा काही अर्थ लागत नाही फोटो पाहून "
मी म्हणालो "एकदा भेट आपण खूप गप्पा मारू मग नक्कीच होईल कविता ".
मग ठरल्या प्रमाणे आम्ही एके दिवशी भेटलो चांगल्या २-१ तास गप्पा मारल्या.
तेव्हा तिचे निरीक्षण केले तिला काय आवडते, काय नाही, तिचे बोलणे, तिचे हसणे, तिच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी, तिचे ध्येय सगळे सगळे.
तिचा निरोप घेतल्यानंतर काही क्षणात सगळे शब्द जुळून आले आणि ही कविता जन्माला आली.
या कवितेला नाव काय द्यावे हे मात्र अजून कळले नाही..

माझी कागदाची होडी....

आज सुटली वेगाने,
माझी कागदाची होडी....
भर पावसात होती,
हेलकावे घेत थोडी.....

पाणी आहे सारे सारे,
थेंब गार गार सारे....
कसे गोठवत आहे,
झोंबणारे न्यारे वारे....

माझ्या राहत्या घराला,
सारा पाण्याचा गराडा....
पण दुर गेला फ़ार,
पुर्‍या अंगाचा उकाडा....

सारी जमलेली पोरं,
पाण्यामध्ये चिंब चिंब...
वर पाहुन आभाळी,
मुखी टिपलेले थेंब...

भिजणारी झाडे होते,
उभी तिथंच निमुट....
पानं पानं होती मग्न,
सुखस्वप्नांचीच लुट....

सारी गल्ली सुनीसुनी,
फ़क्त पोरांचा घोळका...
पावसाच्या सरीमध्ये,
सुरु स्वच्छंद गलका.....

तो बरसावा म्हणुन,
मी केली लाडीगोडी......
फ़ार सुटली वेगाने,
माझी कागदाची होडी......

सखी

सखी -
जणू ती मला भेटली, आणि मी पूर्ण बदलूनच गेलो,

दुपारपर्यंत झोपणारा मी, तिला भेटण्यासाठी लवकर उठू लागलो.

...



रोज कट्यावर बसणारा मी, तिच्यामुळे वर्गात बसू लागलो,

कट्यावर बसून टपोरीगिरी करणारा मी, वर्गात लेक्चर ऐकू लागलो.





कॉलेजला बाईकवर जाणारा मी, तिच्यासाठी बसने जावू लागलो,

स्पाईक केलेल्या माझ्या त्या केसांचा, आता भांग पाडू लागलो.





तिच्यामुळे जीन्स टीशर्ट सोडून, फोर्मल्स घालू लागलो,

देवावरील तिच्या श्रद्धेमुळे, भक्तीगीतेही ऐकू लागलो.





तिला सिनेमा आवडत नाही, म्हणून नाटक पाहू लागलो,

मध्यांतरात पोपकॉर्ण नाही, तर कुल्फी घेऊ लागलो.





प्रत्येक रविवारी तिच्यामुळे आता, समुद्रावर जावू लागलो,

कधीच न खाल्लेले ते चने किनाऱ्यावर तिच्याबरोबर खाऊ लागलो.





इतकी वर्ष टपोरी दिसणारा मी, आज रुपेरी दिसत होतो,

बाबांकडून ही न बदललेला मी, आज तिच्यामुळे पूर्ण बदललो होतो.





हे सारे ऐकल्यावर तुम्हाला, वाटली असेल गम्मत,

पण तिची माझ्या आयुष्यात, खूप आहे किंमत.





अहो, ती मला भेटली, अन मोठी जादूच झाली, तिच्या सहवासात एक चांगली गोष्ट घडली,

ती कधीही, मला भेटायला बोलवायची, अन त्याच भीतीमुळे, माझी (सि***ची) वाईट सवय सुटली.





आज मला कळाले की मुली धोकाच नाही तर, प्रेम ही करतात,

माझ्या सारख्यांना वाईट मार्गावरून, एका चांगल्या मार्गावरही आणतात.





आज या निसर्गाला हात जोडून प्रार्थना केली,

माझ्यासारखा प्रत्येकजण बदलेल, पण प्रत्येकाला 'ही' नाही, हिच्यासारखी जर का सखी भेटली.

मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले

मूळ कविता : मेघ नसता वीज नसता
मूळ कवी : संदीप खरे


मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले
जाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले!
(रस्ता रोडरोलरला म्हणतो)
जाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा?
तू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले!
एवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा?
मुंगळेही डांबरावर भार वाटू लागले
लाख रस्ते मारण्याचे, यम तरीही हळहळे
सापळे सारे कसे एकाच शहरी लावले!
चालताना रंग उडुनी होई चेहरा पांढरा
तेच ते ड्रेनेज उघडे बघ सुगंधू लागले...
भर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली
खोदती रात्री तुला जे, भय तयांचे वाटले

Saturday, 25 June 2011

आमचे ’ हे ’ रात्री अस्स्स्स्से घोरतात..


चोरी,दरोडे पडतात शेजारच्या घरी
आमच्या घरापासून चोर लांबच राहतात
अहो,पहारेकरी नाही काही दारी
आमचे हेच चोरांना पळवून लावतात

हत्यारांविना ते अशी करामत करतात
काहीच न करता , घरा उपयोगी पडतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

जसे तोफांतून दारुगोळे सुसाट सुटतात
की चोर जीव घेऊन पळतच सुटतात
पळतच सुटतात हो धुम्म पळत सुटतात
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

रातराणी फुलते मागच्या अंगणी
चंद्र चांदण्यांचे झिम्मा फुगडी गुंजतात
अहो,छळायला नसतं कुणी एकांती
आमचे हेच युध्दाची तुतारी फुंकतात

चढत्या रातींची नशा उतरवतात
काहीच न करता , मला उपयोगी नसतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

वैदूचे अंगारे,डॉक्टरचे फवारे सारेच फसतात
सारेच फसतात हो सारे उपायच फसतात

आमचे हे रात्री अस्स्स्से घोरतात
घोरतच राहतात हो घोरतच राहतात......

घर्र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्रर्र र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र र्रर्र र्र घुर्र र्र र्रघुर्र्घुर्र्घुर्
 

Friday, 24 June 2011

आजही मला ते सर्व आठवतयं

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत College कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Submission copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.......


-- 

संवाद

संवाद

टाळते आताशा मी वाट अंधाराची
नकोशी आता मज साथ चांदण्यांची ...

उगाच फाडते मी पान आठवणींची
जाळते उगाच मज याद आसवांची ...

दूर सारते मी वाट हि धुक्याची
मोकळीक हवी मज श्वास घेण्याची ...

सांडली मी झोळी अनमोल आठवांची
उरलीत मजजवळ वेदना बोचणाऱ्या काट्यांची ...

गाळली काही मी कडवी अबोल शब्दांची
करू देत मज जरा संवाद माझ्याच मनाशी ...

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

म्हणून ते प्रेम करायचे नसते,

नाही मिळाले ते परत तरी

आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

दुखवले कितीही तिने

तरी हसून तीच्या परत समोर जायचे असते,

कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने

प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

म्हणूनच नाही मिळाले परत तरी

निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते,

तूच माझी निशब्द कविता

तूच माझी निशब्द कविता.

हा पाऊस हा गारवा,
सर्वाना पसंत सारा.
त्यावर तुझे लाजने,
जसा फुलांचा वसंत सारा.


गुलाबी ओठातुन निघालेला,
शब्द तुझा,नवा पाखरू जसा.
हाय तुझे ते मधहोश डोळे,
सांग,मला मी सावरू कसा.

रस्त्यावरी रडणार्याला पाहून,
लगेच रडणारी पुण्यवान तू.
स्वतहाच्या विश्वात हरवलेली,
मानूसकित जशी बंदिवान तू.

टिकली कपाळावरची,
जशे चांदणे,डोळ्यात तुझ्या
सार्‍याच प्रश्नांची उत्तरे.
सुरेख कल्पना तू देवाची,
तुझ्यपासूनच ती सुंदराता,
तू म्हणजेच ” प्रेम खरे”.

तूच विश्व,
नि तूच प्राणिता.
निशब्द हा देव तुझ्यविणा,
तूच माझी निशब्द कविता.

खरच का ग आई

खरच का ग आई
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर
पुढचा जन्म मागतात का?

प्रत्येक सातव्या जन्मी मी
सात जन्म मागणार आहे ,
तुमच्याच पोटी येण्यासाठी मी
एक तरी तप करणार आहे………

प्रत्येक पुढचा जन्म माझी
तूच आई व्हाविस ,
अणि जन्म घेण्याआधीच मला
त्याची माहिती असावी………

तुझ बोट धरून मी
इवली पवल चालेन,
इवली इवली पावल म्हणत
प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन…..

ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
पाणी मी बघितल आहे,
पण तुला हसवान्या साठी मला
परत जन्मा घ्यायचा आहे……..


देता असता आला तर
माझ उरलेला आयुष्य दोघाना देइन,
अणि पुढचा जन्म घेई पर्यंत
तुमच्या मनामधे रहिन….

खरच आई …….

Wednesday, 1 June 2011

प्रेम माझे तू आहेस

प्रेम माझे तू आहेस ,
प्रेयसी ही तूच आहेस ,
साथ माझी तू आहेस ,
वेड माझे तूच आहेस ...

तूच माझे बोल ,
माझी कविता तूच आहेस ,
तूच माझे शब्द ,
वाक्य माझे तूच आहेस ...

रात्र माझी तू आहेस ,
दिवस माझा तू आहेस ,
तूच इन्द्रधनुष्य माझा ,
पावसातही तूच आहेस ...

देव माझा तू आहेस ,
धर्म देखिल तूच आहेस ,
भाव माझे तू आहेस ,
भवनांतही तूच आहेस ..

Tuesday, 31 May 2011

आठवते का तुला?

आपली नवीन ओळख झाली होती
फोनवर तासन् तास गप्पांची साथ होती......
आठवते का तुला?
आपण पहिल्यांदा भेटायचे ठरवले
एकमेकांना पहिल्यांदा पहायचे ठरवले......

आठवते का तुला?
आपलं पहिल्यांदा समुद्रकिनारी भेटणं
एकमेकांची नजर चुकवुन एकमेकांना न्याहाळणं......
आठवते का तुला?
माझ्या मनातलं गुपित मी सांगितलं
तू पण प्रेम करतेस माझ्यवर हे जाणवले......
आठवते का तुला?



त्यानंतरचं आपलं वारंवार भेटणं
थोड्याशाही विरहाने आपलं अगतिक होणं
किती स्वप्नवत होते ते दिवस
सदा तुझ्याच विचारांत असे हे मन
आज तू ही तूच आहेस
आणि मी ही मीच आहे
माझ प्रेम ही अगदी तसंच आहे
किंबहुना ते तू विसरली असशील
आज आपल्यामध्ये काहीही नसेल


शरीराने दूर असली तरी मनाने आहे जवळ
चूक तुझीही नाही, करियरचा चिंताच तुंबळ
खुप समजावलं वेड्या मनाला, सर्व परत नीट होईल
वेळात वेळ काढून, ती तुला भेटायला येइल
मनाला आवर घालणं नाही ग जमत मला
सारखं रागावून त्रास नसतो द्यायचा तुला
समजून घे ग मला.....
वाटेकडे डोळे लावून तुझ्या
विचारांत असतो फक्त तुझ्या
प्रत्यक्षात नाही जमलं तर
स्वप्नांत तरी येशील ना माझ्या?

Sunday, 29 May 2011

शून्यातही तुला विसरणारा मी नाही

चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही


थोडे थोडे म्हणतांना
शब्दच सारे संपून गेले
दार उघडून पाहीले तर
रक्ताळ्लेले ह्रदय हसत मेले


जीवनाच्या मॆफिलीत आज
सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली
आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले..........
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले.........


तुझ्याच त्या स्मितहास्यात
किती होकार लपले होते
कधी काळी मला ते
लाखोंनी भेटलेही होते.....
साकारलेल्या त्या भावनांना
का आज शब्दच नाहीत??
का आज त्या डोळ्यांमध्ये
माझी एक ओळखही नाही


-- 

Thursday, 26 May 2011

मी अन तु


काल तू स्वप्नात आलीस् म्हणालीस !
जीवनाचे रंग आणणार होतास् तु.

गेला तो,परतलीच  नाहीस.
कसं सांगू तुला,
भौतिक ऐश्वर्याच्या बाजारात
मला तुझ्यासाठी,
काहीच होता आलं नाही.

अन् तेव्हा तूच अलगदच,
तुझ्या पाऊलखूणा माझ्यावर ठ्सवून.
पक्षांच्या थव्यांबरोबर.
दूर निघून गेलीस.

शहाणं बनून शहाण्या सारखं सगळेच जगत असतात-------


शहाणं बनून शहाण्या सारखं सगळेच जगत असतात
सुख दुःखाला आपल्या ते व्यवहारानं भागत असतात
व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे
कुणासाठी तरी अस वेड बनून जगण्यात खरी मजा आहे
वर्षाकाळी आकाशात काळे मेघ जमणारच
वृष्टीतून सृष्टी माया आपल्यावर करणारच
पाऊस पडू लागला की शहाणी माणसं शिंकू लागतात
छत्री आणि रेनकोटच महत्त्व ते घोकू लागतात
एक वेडा गिरक्या घेत तेव्हा पावसात भिजत असतो
येरे येरे पावसा तुला देतो पैसा म्हणत असतो
पैशाच मोल शहाण्या इतकं कुणालाच कळत नसत
पण एक पैसा देऊन पाऊस घेणं त्यांना वळत नसत
व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे
कुणासाठी तरी असं वेडं बनून जगण्यात खरी मजा आहे
वसंत आपल्या कुंचल्यानं सारी सृष्टी रंगवू लागतो
जीवन गाणं कोकीळ कुहु कुहु गाऊ लागतो
गाणं म्हणल की शहाणा माणूस सरसावणारच
कुठला राग कुठली बंदिश सांगून तुम्हाला घाबरवणारच
एक वेडा तेव्हा आपल्याच नादात गात असतो
आपल्याच तालात आपल्याच सुरात न्हात असतो
गाण्याचा कायदा शहाण्या इतका कुणालाच कळत नाही
पण बेधुंद होऊन गाण्याचा फायदा मात्र त्याला वळत नाही
व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे
कुणासाठी तरी अस वेड बनून जगण्यात खरी मजा आहे

माय मराठी


महाराष्ट्राच्या तख्तावरती, सदैव धरिते स्निग्ध साउली,
कोण काय हो पुसता राजे, हीच आपुली माय माउली ॥
शूरवीरांची वीरश्री ही, संतमहंतांची तेजश्री
कवीवरांची ही काव्यश्री अन् वेदांची ही वेदश्री ॥
शिवरायांची ही मराठी बोली, टिळकांनी गीता रहस्यविली
भीम-फुल्यांनी बहुजनांत नेली, शाहिरांनी कवने सजविली ॥
ज्ञानियांची ज्ञानेश्वरी ही, तुकयांची ही अभंगवाणी
समर्थांचिये दासबोधे, नाथांघरी ही भरते पाणी ॥
साहित्याचा हिचा फुलोरा, अन् काव्याचा हा डोलारा
महाराष्ट्राच्या या देव्हारा, देवत्वचि जणू ये आकारा ॥
नतमस्तक मी हिच्या पाऊली, याचक मी गे तुझ्या राऊळी
गाऊ दे मला गान तुझे गे, प्रसन्न होई मराठ बोली, माय माउली ॥ 

आपल्या दोघा असा शाप का?


आपल्या दोघा असा शाप का?
पाहतो चोरून तुझा बाप का?
रोज धावतो 'दहा'चे लॅप मी
पाहताच तुला लागे धाप का?
भेटतो तेव्हा मुका मी राहतो
सूटतो पायास माझ्या काप का?
जवळ येताना असा का चेहरा?
नेहमी डोक्यात तुझ्या पाप का?
राहतो राणी तुझ्या हृदयात मी
मारते  आहेस मला तू थाप का?