Showing posts with label सौँदर्य. Show all posts
Showing posts with label सौँदर्य. Show all posts

Sunday, 29 May 2011

शून्यातही तुला विसरणारा मी नाही

चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही


थोडे थोडे म्हणतांना
शब्दच सारे संपून गेले
दार उघडून पाहीले तर
रक्ताळ्लेले ह्रदय हसत मेले


जीवनाच्या मॆफिलीत आज
सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली
आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले..........
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले.........


तुझ्याच त्या स्मितहास्यात
किती होकार लपले होते
कधी काळी मला ते
लाखोंनी भेटलेही होते.....
साकारलेल्या त्या भावनांना
का आज शब्दच नाहीत??
का आज त्या डोळ्यांमध्ये
माझी एक ओळखही नाही


-- 

Thursday, 26 May 2011

मी अन तु


काल तू स्वप्नात आलीस् म्हणालीस !
जीवनाचे रंग आणणार होतास् तु.

गेला तो,परतलीच  नाहीस.
कसं सांगू तुला,
भौतिक ऐश्वर्याच्या बाजारात
मला तुझ्यासाठी,
काहीच होता आलं नाही.

अन् तेव्हा तूच अलगदच,
तुझ्या पाऊलखूणा माझ्यावर ठ्सवून.
पक्षांच्या थव्यांबरोबर.
दूर निघून गेलीस.

माय मराठी


महाराष्ट्राच्या तख्तावरती, सदैव धरिते स्निग्ध साउली,
कोण काय हो पुसता राजे, हीच आपुली माय माउली ॥
शूरवीरांची वीरश्री ही, संतमहंतांची तेजश्री
कवीवरांची ही काव्यश्री अन् वेदांची ही वेदश्री ॥
शिवरायांची ही मराठी बोली, टिळकांनी गीता रहस्यविली
भीम-फुल्यांनी बहुजनांत नेली, शाहिरांनी कवने सजविली ॥
ज्ञानियांची ज्ञानेश्वरी ही, तुकयांची ही अभंगवाणी
समर्थांचिये दासबोधे, नाथांघरी ही भरते पाणी ॥
साहित्याचा हिचा फुलोरा, अन् काव्याचा हा डोलारा
महाराष्ट्राच्या या देव्हारा, देवत्वचि जणू ये आकारा ॥
नतमस्तक मी हिच्या पाऊली, याचक मी गे तुझ्या राऊळी
गाऊ दे मला गान तुझे गे, प्रसन्न होई मराठ बोली, माय माउली ॥ 

येतसे स्वप्नांत माझ्या ...


येतसे स्वप्नांत माझ्या "माधुरी"ला मी वरावे
उघडता डोळे समोरी बायकोचे ध्यान यावे
जीवनावर राज्य माझ्या सासूचे अन बायकोचे
पाशवी हे बंध तोडून सांग मी कैसे पळावे
लोक का हसती कळेना पाहूनी हालास माझ्या
काय जळते आत पण हे कसे त्यांना कळावे
विसरण्या हे दुःख सारे वाटले दारू प्यावी
नेमके मी पीत असता मेव्हणीने का पाहावे
हसलो हलकेच गाली मी तिला पाहूनी तेथे
 हे आता रोजचेच आम्ही एकमेका सावरवे
झाडले प्रस्थापितांनी खोड माझी मोडण्याला
विडंबने लिहितो तरीही काय मी ह्याला म्हणावे

गरज आहे आज मला.........

गरज आहे आज मला.........
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची

गरज आहे आज मला...........
त्या  तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला..............
 त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजहि  मला..........
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या  जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे............. तुझी..........

Monday, 23 May 2011

सौँदर्य

Action is the foundational key to all
success.
♪♪♪Always Keep Smiling!! ♪♪♪
“ सुंदर दिसणं महत्वाचं नाही,
तर सुंदर असणं महत्वाचं आहे "