Showing posts with label विनोद. Show all posts
Showing posts with label विनोद. Show all posts

Saturday, 25 June 2011

आमचे ’ हे ’ रात्री अस्स्स्स्से घोरतात..


चोरी,दरोडे पडतात शेजारच्या घरी
आमच्या घरापासून चोर लांबच राहतात
अहो,पहारेकरी नाही काही दारी
आमचे हेच चोरांना पळवून लावतात

हत्यारांविना ते अशी करामत करतात
काहीच न करता , घरा उपयोगी पडतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

जसे तोफांतून दारुगोळे सुसाट सुटतात
की चोर जीव घेऊन पळतच सुटतात
पळतच सुटतात हो धुम्म पळत सुटतात
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

रातराणी फुलते मागच्या अंगणी
चंद्र चांदण्यांचे झिम्मा फुगडी गुंजतात
अहो,छळायला नसतं कुणी एकांती
आमचे हेच युध्दाची तुतारी फुंकतात

चढत्या रातींची नशा उतरवतात
काहीच न करता , मला उपयोगी नसतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

वैदूचे अंगारे,डॉक्टरचे फवारे सारेच फसतात
सारेच फसतात हो सारे उपायच फसतात

आमचे हे रात्री अस्स्स्से घोरतात
घोरतच राहतात हो घोरतच राहतात......

घर्र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्रर्र र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र र्रर्र र्र घुर्र र्र र्रघुर्र्घुर्र्घुर्
 

Friday, 24 June 2011

आईला सांग कॉम्प्लान दे

लहानगा गंपू जंगलात फिरत असतो. 
तेवढ्यात त्याला एक साप झाडाला लटकत असलेला दिसतो. 
गंपू त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, 
'अशाने उंची नाही वाढत.... 
आईला सांग कॉम्प्लान दे!!' 

मिस्ड कॉल [विनोद]

गंपूला एक जण सारखा सारखा मिस्ड कॉल देऊन त्रास देत असतो . 
कंटाळून गंपू सिमकार्ड बदलतो 
णि 
त्याला एसएमएस करतो , 


' मी ते सिमकार्ड बंद केलं ....
 आता कसा मला मिस्ड कॉल देशील ??' 

नवरा-बायको चे भान्डण


नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. 


बायको : (रागाने) मी माझ्या आईचा सल्ला मानला असता आणि तुमच्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. 


नवरा : काय...तुझ्या आईने माझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं? 


बायको : नाही तर काय? 


नवरा : अरे देवा...आणि मी सासूबाईंना समजण्यात आतापर्यंत किती मोठी चूक करत होतो. 

Monday, 13 June 2011

कोर्टातील उलटतपासणी [विनोद]


कोर्टातील अशीच एक उलटतपासणी. 


वकील : तुमच्या नोकराचं वय काय आहे? 


साक्षीदार : पंधरा ते वीस वर्षे असावे. मला नेमकं माहीत नाही.


वकील : तो तुमच्याकडं किती वर्षापासून राहतो आहे? 


साक्षीदार : गेल्या पंचवीस वर्षांपासून! 

Sunday, 12 June 2011

इलेक्टेशिअनचा विनोद

एका बाईने गंपू इलेक्टेशिअनला डोअर बेल दुरुस्त करायला बोलावलं. 
परंतु, 
गंपू चार दिवस त्यांच्या घरी गेलाच नाही.
अखेर त्या बाईंनी कंटाळून पुन्हा गंपूला फोन केला. 
गंपू वैतागून म्हणाला, 
'अहो बाई, चार दिवस तुमच्या घरी येतोय.
पण शंभरदा बेल वाजवूनही तुम्ही दरवाजा उघडत नाही म्हणजे काय?'

Friday, 10 June 2011

’जिन’का बच्चा

जत्रेत घोषणा होत असते.
' एक बच्चा खो गया है .
 जिनका है , लेके जाए .' 


गंपू तिकडे जातो आणि म्हणतो, 
 ' मला पण दाखवा ... 
देखू तो 
जिन’का 
बच्चा कैसा होता है !!' . 

सफरचंदचे गणित

प्रश्न : एका पिशवीत तीन सफरचंदं होती .
 त्यात आणखी दोन सफरचंदं ठेवली तर काय होईल ? 


उत्तर : तिसरीच्या गणित विषयासाठी एक प्रश्न !!!

भुतचा थरथराट [विनोद]

एक भूत मध्यरात्री १२ वाजता दुसऱ्या भुताला म्हणालं, 
उगाच थरथर कापू नकोस. 
वेड्यासारखं घाबरू नकोस.
 हे सगळे मनाचे खेळ असतात. 
नीकां नीकां सं गा काही तं. 

एवढं मोठं घर माझं [विनोद]

नंदू : अरे, माझं घर इतकं मोठं आहे की एखादी लोकल ट्रेन त्यात सहज फिरु शकते. 


चंदू : ह्यॅ...हे तर काहीच नाही. माझं घर एवढं मोठं आहे की एका कोपऱ्यातून दुसरीकडे फोन करायचा झाल्यास रोमिंग चार्ज लागतो. 

Tuesday, 24 May 2011

तुझ्या मनाला येईल ते कर!


वडील : माझा मुलगा मी सांगितलेलं सगळं तंतोतंत ऐकतो!
मित्र : व्वा! कसं काय?
...........................>..................
........................
.........................
वडील : मी त्याला सांगितलंय, तुझ्या मनाला येईल ते कर!

मीटर


रिक्षावाला : सॉरी साहेब, मी मीटर टाकायला विसरलो.
................................
..........................
...........................
..........................
.......................
गंपू : अरे जाऊ दे, मीसुद्धा माझं पाकीट आणायला विसरलोय.

दशमुखी रावण

एकदा रावणाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि तो श्रीरामांना माफी मागायचे
ठरून अयोद्ध्येला जातो. प्रभुरामाच्या महालाचा दरवाझा ठोठावतो.
श्रीराम दारवाझा उघडतात.
पण रावण काही न बोलता विचार करत उभा राहतो…
कसला विचार बरे ?
-
-
-
-
-
कुठल्या तोंडाने माफी मागू ? 

एक्सेल


कॉम्प्युटरची परीक्षा सुरू असते.
परीक्षक : मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय?
........................................
.....................
..........................
........................
विद्याथीर् : मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सर्फ एक्सेलचा नवीन प्रकार, ज्याचा
वापर कॉम्प्युटर धुण्यासाठी केला जातो!!!

संताचा इंटरव्ह्यू


एकदा संता इंटरव्ह्यूला जातो.
मॅनेजर : चल सांग, फोर्ड म्हणजे काय?
संता : सर, फोर्ड ही एक चारचाकी गाडी आहे.
मॅनेजर : वा...मग आता सांग ऑक्सफोर्ड काय आहे?
संता : सोप्पंय...बैलगाडी. ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी..

गंपू गंमत


शिक्षक : गंपू, तुला उशीर का झाला?
गंपू : रस्त्यात लिहिलेल्या एका पाटीमुळे मला उशीर झाला?
शिक्षक : कोणती पाटी?
गंपू : पुढे शाळा आहे... हळू जा.

लई भारी रे एक नंबर डायलॉग


एक मुलगा देवाला विचारतो,
'तिला गुलाबाचं फूल का आवडतं??
ते तर एका दिवसात मरून जातं.
मग तिला मी का आवडत नाही?
...............
.............
मी तर तिच्यासाठी रोज
मरत असतो..
..........................
.........................
..............................
..........
...' देव उत्तर देता,
......................................... 'लई भारी रे.................
........................
...........
एक नंबर डायलॉग!!'