Showing posts with label आठवण. Show all posts
Showing posts with label आठवण. Show all posts

Friday, 24 June 2011

आजही मला ते सर्व आठवतयं

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत College कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Submission copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.......


-- 

Tuesday, 31 May 2011

आठवते का तुला?

आपली नवीन ओळख झाली होती
फोनवर तासन् तास गप्पांची साथ होती......
आठवते का तुला?
आपण पहिल्यांदा भेटायचे ठरवले
एकमेकांना पहिल्यांदा पहायचे ठरवले......

आठवते का तुला?
आपलं पहिल्यांदा समुद्रकिनारी भेटणं
एकमेकांची नजर चुकवुन एकमेकांना न्याहाळणं......
आठवते का तुला?
माझ्या मनातलं गुपित मी सांगितलं
तू पण प्रेम करतेस माझ्यवर हे जाणवले......
आठवते का तुला?



त्यानंतरचं आपलं वारंवार भेटणं
थोड्याशाही विरहाने आपलं अगतिक होणं
किती स्वप्नवत होते ते दिवस
सदा तुझ्याच विचारांत असे हे मन
आज तू ही तूच आहेस
आणि मी ही मीच आहे
माझ प्रेम ही अगदी तसंच आहे
किंबहुना ते तू विसरली असशील
आज आपल्यामध्ये काहीही नसेल


शरीराने दूर असली तरी मनाने आहे जवळ
चूक तुझीही नाही, करियरचा चिंताच तुंबळ
खुप समजावलं वेड्या मनाला, सर्व परत नीट होईल
वेळात वेळ काढून, ती तुला भेटायला येइल
मनाला आवर घालणं नाही ग जमत मला
सारखं रागावून त्रास नसतो द्यायचा तुला
समजून घे ग मला.....
वाटेकडे डोळे लावून तुझ्या
विचारांत असतो फक्त तुझ्या
प्रत्यक्षात नाही जमलं तर
स्वप्नांत तरी येशील ना माझ्या?

Sunday, 29 May 2011

शून्यातही तुला विसरणारा मी नाही

चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही


थोडे थोडे म्हणतांना
शब्दच सारे संपून गेले
दार उघडून पाहीले तर
रक्ताळ्लेले ह्रदय हसत मेले


जीवनाच्या मॆफिलीत आज
सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली
आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले..........
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले.........


तुझ्याच त्या स्मितहास्यात
किती होकार लपले होते
कधी काळी मला ते
लाखोंनी भेटलेही होते.....
साकारलेल्या त्या भावनांना
का आज शब्दच नाहीत??
का आज त्या डोळ्यांमध्ये
माझी एक ओळखही नाही


-- 

तुझी आठवण

विसरून तुला कित्येक वर्ष पालटली
हे आता आठवत नाही
तुला आठवणं सोडून दिलं की त्यांचं येणं बंद झालं
आता हे ही आठवत नाही

मी तुला विसरलोय, मी हे सुद्धा विसरलोय
स्मरणात तसं काहीच नाही .....

पण कुठे झाली ताटातूट, कुठे चुकलो रस्ता
ते मात्र आठवतंय

आणि आठवतंय की,
त्या वळणावर मी उभा होतो बराच काळ
तू गेल्यावर ही, आज सारखाच

शिवाय हे ही आठवतंय की,
या वळणावर माझ्या हातून
दिशा हरवाव्यात तशी तू हरवून गेली

गतकाळाच्या पडद्या आडून तुझी आठवण आली

तुझी आठवण २

नेहमीच येते सुखकारक आठवण ऐसे नाही
आज अशी आली की.....
आसवेड्या पापण्यांना पेलावली नाही

सोसायास्तव तयास केले
त-हेत-हेचे लक्ष प्रयत्न
सोसली नच आठवण तुझी
मग उतू गेली आसवे माझी

त्यास पुसण्या जेव्हा
शोधू लागलो माझा रुमाल
आठवले की, तुलाच
देऊ केला होता काल
काल कुठे?
त्याला उलटून गेलेत कित्येक साल

विसरावे हे ही म्हणून
माळावरची रद्दी काढत बसलो
शून्य रिकामा बसून मग
चाळू लागलो कसले कागद
तुझीच होती शब्द गोंदणे
अन नाव तुझेच खाली
उंबया पर्यंत आलेलं मन
फिरलं पुन्हा उलट्या पावली

गतकाळाच्या पडद्या आडून तुझी आठवण आली


तुझी आठवण १

गतकाळाच्या पडद्या आडून
अशी तुझी आठवण आली

जळाजळातून, कणाकणातून
नसेल जरी, तरी वाटले
अंतरातून तुझी आठवण आली

आली धावून, आतुर होऊन
उभी राहिली पसरून बहु
जरा बावरत, तरी सावरत
डुंबत डुंबत, जरा तरंगत
जशी एरवी येते अकाली,
तशी आज ही अलगद आली
इवल्या इवल्या पावलांनी
चंद्रधनुंच्या सावल्यांनी
खेळत झिम्मा, घालत फुगडी
घेत स्वताशीच फेरी
लगबगीने निघावी
नववधुच जणू माहेरी

गंधातूर वेणीत जणू,
कुणी माळव्यात जशा फुलवेली
गतकाळाच्या पडद्या आडून
तशी तुझी आठवण आली


Thursday, 26 May 2011

येतसे स्वप्नांत माझ्या ...


येतसे स्वप्नांत माझ्या "माधुरी"ला मी वरावे
उघडता डोळे समोरी बायकोचे ध्यान यावे
जीवनावर राज्य माझ्या सासूचे अन बायकोचे
पाशवी हे बंध तोडून सांग मी कैसे पळावे
लोक का हसती कळेना पाहूनी हालास माझ्या
काय जळते आत पण हे कसे त्यांना कळावे
विसरण्या हे दुःख सारे वाटले दारू प्यावी
नेमके मी पीत असता मेव्हणीने का पाहावे
हसलो हलकेच गाली मी तिला पाहूनी तेथे
 हे आता रोजचेच आम्ही एकमेका सावरवे
झाडले प्रस्थापितांनी खोड माझी मोडण्याला
विडंबने लिहितो तरीही काय मी ह्याला म्हणावे

आमच्या महाराजां बदद्ल आम्हाला काय विचारता






आमच्या महाराजां बदद्ल आम्हाला काय विचारता,
विचारायचे असेल तर विचारा
त्या सह्याद्रीच्या कड्याकपारींमध्ये वावरणारया वाघांना,
खनखनणारया तलवारींना,अरबी सागराला,मराठी रक्ताला ,
आणि पाणी पिताना ' शिवाजी ' दिसले

म्हणुन चार पावले मागे फिरणार्या मोगलांच्या घोड्यांना.
पोलादी मुठीत आजही हत्तीचे बळ आहे,
रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे,
डोळ्यातला निखारा आजही लाल आहे,
आडवे येऊ नका मराठ्यांमध्ये आजही
"शिवबा" तसाच आहे.

___________________________________________________________________________________________________

हिंदवी स्वराज्य संस्थापक , महाराष्ट्राचे आराध्य दैवत ,जाणता राजा ,छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा .. जय भवानी जय शिवाजी









--






Tuesday, 24 May 2011

आठवण तुझी....


आठवण तुझी येतच नव्हती
कारण तू येणारच होतास, माझ्यासाठी
आठवण तुझी येतच होती
कारण तू येणार होतास, जाण्यासाठी
का असा छळतोस मला?
हवे असताना तू, टाळतोस मला?
भेट तुझी-माझी होणारच आहे
कारण मी 'तुझ्यासाठी' येणारच आहे
कळत कसे नाही तुला?
तुझ्या शिवाय अर्थ नाही मला....
स्पर्श तुझा जाणवत राहतो
कळतच नाही कि, तो भास असतो
कसली हि आतुरता? कशासाठी आसुसलेपणा?
असतोस तू जवळ, तरीही अधुरेपणा....
घटत काळोखात मिटून जावसं वाटतं
तुझ्या मिठीत भरून राहावंस वाटतं
भुकेले ओठ, तहानलेली नजर,
आता थोडी तरी किव कर
हे सगळं तुला कवितेतलं वाटतंय?
पण कधीपासून असं मनात सलतंय
पापण्या मिटल्यावर तूच असतोस
उघडल्यावर, पापण्या संगे वेडी आस असते
येशील? दूर? जिथे हे सगळं संपणार असेल?
असा अंत खरंच आपल्याला मिळेल?
बोलना, काहीतरी बोल! खोल-खोल!
का तुझे डोळे, नि माझ्या भावना अबोल?
भावनांना डोळ्यांतून वाटा करून दे,
तू माझा माझ्यासाठी राहू दे....!
तू माझा माझ्यासाठी राहू दे....!
आभार - लेखक / कवी
submitted by: - बाळकृष्णा