Thursday, 7 July 2011

"मित्रमराठी"~ आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?

लहान असताना आयुष्य कसं, आनंदाने भरलेलं असतं
मोठे होईपर्यंत त्याचं गमक, आपल्याला मुळी कळत नसतं
हळू हळू शाळा संपते, कॉलेज ची वाट मोकळी होते
जमिनीवर चालता चालता, जिंदगी आपल्याला हवेत नेते
हळूच डोकावणाय्रा अक्कलदाढेचं, कौतुक आमचं संपत नसतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
कॉलेज संपतं, आम्ही नोकरी शोधतो
त्यानंतर  छोकरी पाहून, एका नव्या बंधनात अडकतो
आईच्या हाती बनलेलं जेवण, दोन वेळा आम्हाला हवं असतं
रात्री बायकोच्या कुशीत शिरून, गाढ झोपून जायचं असतं
आपल्या माणसांच्या सहवासात, सगळं आयुष्य घालवायचं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
दिवसांवर दिवसांच्या राशी, प्रश्न नवे दर दिवशी
जगात काय चाल्लंय? माझा काय घेणं त्याच्याशी?
दुनियेच्या राजकारणात आम्हाला, अजिबात पडायचं नसतं
सामाजिक प्रश्न; आणीबाणी, याशी आमचं काही नातं नसतं
आम्ही आमच्या लहान विश्वात, आमचं सुख शोधलेलं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
असच आयुष्य पुढे सरकतं, मुलाबाळांनी घर फुलतं
नव्या जबाबदाय्रांमध्ये आम्ही, पुरते अडकून बसतो
त्याचं बालपण त्याचं शिक्षण, ह्यातच आम्ही हरवून जातो
दर वर्षी सुट्टीत एकदा, महाबळेश्वर ला फिरून येतो
त्या क्षणांच्या आठवणींवर आमचं, पूर्ण वर्ष सुखात जातं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
हळू हळू  जगता जगता, आमचं वय दिसू लागतं
सगळं आयुष्य मग, मुलांच्या खांद्यावर विसावतं
"सांभाळून घेतील आपल्याला", असा कायम समज असतो.
आणि आयुष्याच्या ह्या लढाईत मात्र, आम्ही बहुतेक हरलेले असतो
थोडासा आधार आणि नातवंडांचं, भरघोस प्रेम हवं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
आयुष्याचा अंत जवळ येतो, आपण जुन्या आठवणी शोधू लागतो
काही मागे राहायला नको, सगळे क्षण आठवत राहतो
तीच तर शिदोरी असते, जाताना मनात साठवून न्यायची
बहुतेक पूर्तता झालेली असते, आमच्या बय्राच  इच्छांची
समाधानाचे अनंत श्वास, आपण अशा वेळी उपभोगत असतो
आणि आमच्यासारख्यांना मरण्यासाठीही आणखी कुठे काय हवं असतं?????

No comments:

Post a Comment