समाजाचं अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं.
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
कायदा सुव्यवस्थेला, कुणी भीत नाही राजे,सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे,
आया, बहिणी, लेकी, सुना, पवित्र राहिली नाहीत नाती,
शासन करणाऱ्या तलवारीचीच गंजून गेलीयेत पाती.
आपल्या आब्रूचे लक्तर, आब्रू झाकण्यासाठीच मागावं लागतं,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
हिंदवी स्वराज्य स्थापन करून, तुम्ही निघून गेलात राजे,
राष्ट्र प्रेमच स्फुल्लिंग करून, तुम्ही निघून गेलात राजे,
पण... या पेटलेल्या राष्ट्रप्रेमावर, स्वताचीच पोळी भाजणाऱ्या...
आणि आमचीच मतं घेऊन, शेवटी सत्तेने माजणाऱ्या.
गल्लीबोळातल्या पुढाऱ्याला, "रयतेचा राजा" म्हणावं लागतं,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
इंग्रज इथं दीडशे वर्षे राज्य करून निघून गेले,
भारतीयांचं काय पाणी, ते भारतात राहून बघून गेले,
भारतीय संस्कृतीच्या छाताडावर, आता पाश्चात्य संस्कृती नाचतेय,
महाराष्ट्रीय तुतारीच्या नावाखाली, इथे इंग्रजीचीच पिपाणी वाजतीये.
माय मराठी मरतेय राजे आणि इंग्रजीला पालखीत बघावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
ज्यांच्याकडे पैसा आहे, त्याचं जगणं झालाय मस्त,
नी पोटासाठी राबनाऱ्याच, इथं मरण झालाय स्वस्त,
किड्यामुंग्यासारखी इथं, जगताहेत मानसं,
दिवसाढवळ्या, आपलं मरण बघतायेत मानसं.
वेदना असह्य होतात, म्हणून इच्छा मरण मागावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
तुमच्या सारखा छत्रपती पुन्हा इथे झाला नाही,
पुन्हा कुठल्या जिजाऊ पोटी शिवबा जन्माला आला नाही.
घराघरातल्या जिजाऊ आता, करियर वूमन होत आहेत,
संस्कार करण्या ऐवजी पोराला, पाळणाघरात देत आहेत.
कुत्र आई नी पोरगं दाई कडे असलेलं बघावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
आता एक करा राजे, या पुढे प्रेरणा कोणाला देऊ नका,
अन कृपा करून तुम्ही आमच्या स्वप्नातही येऊ नका..
काय सांगू राजे, आता इथल्या तरुणाई बद्दल बोलवत नाही,
नी तुमच्या आदर्शाच ओझ, इथल्या तरुण खांद्यांना पेलवत नाही.
कर्तव्य विसरून आमची तरुणाई, आपल्याच मस्तीत मग्न आहे,
घराघरातील मूर्ती तुमची, मनामनात भग्न आहे.
तुमच्या जयंतीला राजे, वर्षातून दोन वेळा नाचावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
अन्याय, अत्याचार, अधर्मावर, इथल्या माणसाचं जीवापाड प्रेम जडलंय,
आणि हिंदू पतपातशाहीवर राजे,दहशतवादच सावट पडलंय.
बॉम्बस्फोटाच्या भीतीने, वारा सुगंध देत नाही,
नी आपल्याच मातृभूमीत राजे, मोकळा श्वासही घेता येत नाही.
गुंड सुटतात मोकाट आणि निर्दोशांना वर्षानुवर्ष न्यायालयात लढावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
स्वराज्य इथ आहे राजे, पण सुराज्याचा पत्ता नाही,
म्हणतात ना... कौरव सारे माजले आहे आणि पांडवानाच सत्ता नाही
विरोध करण्याची हिम्मत जाऊन, निष्क्रीयताच पक्की मुरली आहे,
माझीही तलावर बोथट झालीये, आता फक्त शब्दांनाच धार उरली आहे.
समाजपरिवर्तनाच चक्र इथं, दुबळ्या हातांनाच फिरवावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
ताठ मानेनं जगावं म्हटलं, तर राजे, आपलीच मानसं जगू देत नाहीत,
आणि भ्रष्टाचारमुक्त, अखंड भारतच स्वप्न बघू देत नाहीत.
आता हीच निष्क्रिय मानसं, माझा सर्वस्व लुटतील,
आणि तुमच्यावर कविता लिहिली म्हणून माझ्या जीवावर उठतील.
तरी बरं तुमचंच रक्त वाहतंय, माझ्या नसानसामधनं म्हणून लिहावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
जातील राजे, नक्की जातील, "हे हि दिवस" एकदिवस,
स्वताच्या चुकांची जाणीव होयील, प्रत्येकालाच एकदिवस.
मात्र त्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न हवेत करायला,
बुडणाऱ्याला काडीशिवाय, दुसरं काय लागतं तरायला?
पुन्हा एकदा त्याच डौलानं, भगवा झेंडा फडकणार,
कुणाच्याही चिथावणीने, आमची माथी नाही भडकणार.
आता आम्ही विचार करू, रायते साठी कष्ट करू,
समाज बदलण्यासाठी राजे, स्वतापासून सुरुवात करू.
तुमचेच वारस आम्ही राजे, फक्त रक्त उसळाव लागतं
हा समाज बदलण्यासाठीच राजे, या जगात जगावं लागतं...
“लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...!!”, ही कविता माझी स्वतःची आहे...... आणि या व अशा प्रकारच्या वांग्मयीन चौर्याचा मी निषेध करतो.........
ReplyDeletehttp://www.facebook.com/photo.php?fbid=332855320098185&set=a.145802922136760.40516.100001211600673&type=3&theater
मी नेहमी सांगत असतो, की कोणतीही रचना तुम्हांला आवडली तर किमान त्या कवीचे, लेखकाचे नाव त्या साहित्यकृती बरोबर राहु द्यात... माझ्या कोणत्याही कवितेबरोबर माझे नाव कवी म्हणून असलेच पाहिजे हा माझा अट्टाहास नाही तर माझा हक्कच आहे आणि हे दुस-यांच्या लेखनाचे बिनधास्तपणे Copy & Paste करणे आणि स्वत:च्या नावावर खपवणे या फेसबुकवर नित्याचेच झाले आहे....
हा कोण पुष्कर घाटपांडे आहे मला माहित नाही, पण या प्रकारचे निंदनीय कृत्य करण्यापुर्वी किमान स्वतःची तरी शरम बाळगून या कवितेतील विचारांची अशी त्या त्याने करणे म्हणजे या कवितेची फार मोठी बदनामी करणे आहे.
मी कधीही दुसऱ्यांचे लिखाण चोरून स्वतहाच्या नावावर खपवत नाही, तुम्हीही असे करू नका... किमान, “हे लिखाण माझे नाही” असे सांगण्याचा तरी मनाचा मोठेपणा दाखवा.... इतके वैचारिक दारिद्र्य दाखवून मूळ लेखक, कवींचा अपमान करू नका, ही नम्र विनंती.
अन्यथा मला Copyright Act खाली कायदेशीर कारवाई करावी लागेल..... माझी कोणतीही पूर्वपरवानगी ना घेता संपर्क ना करता खुशाल स्वतःच्या नावावर ही कविता खपविणा-या या पुष्कर घाटपांडे याच्या या वांग्मयीन चौर्यावर कायदेशीर कारवाई का करू नये....?
तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
आपला विनम्र
प्रा. गुरुराज गणेश गर्दे
समुपदेशक,
घरचा पत्ता :- ८४१ दुर्गानिवास, बांदा. ता. सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग. ४१६५११.
सध्या वास्तव्य :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
सहजसंपर्क :- 9021501924
rajgarde@gmail .com

सहजसंपर्क :- 9175484606
gardegururaj@gmail .com
Reply