Saturday 25 June 2011

आमचे ’ हे ’ रात्री अस्स्स्स्से घोरतात..


चोरी,दरोडे पडतात शेजारच्या घरी
आमच्या घरापासून चोर लांबच राहतात
अहो,पहारेकरी नाही काही दारी
आमचे हेच चोरांना पळवून लावतात

हत्यारांविना ते अशी करामत करतात
काहीच न करता , घरा उपयोगी पडतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

जसे तोफांतून दारुगोळे सुसाट सुटतात
की चोर जीव घेऊन पळतच सुटतात
पळतच सुटतात हो धुम्म पळत सुटतात
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

रातराणी फुलते मागच्या अंगणी
चंद्र चांदण्यांचे झिम्मा फुगडी गुंजतात
अहो,छळायला नसतं कुणी एकांती
आमचे हेच युध्दाची तुतारी फुंकतात

चढत्या रातींची नशा उतरवतात
काहीच न करता , मला उपयोगी नसतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

वैदूचे अंगारे,डॉक्टरचे फवारे सारेच फसतात
सारेच फसतात हो सारे उपायच फसतात

आमचे हे रात्री अस्स्स्से घोरतात
घोरतच राहतात हो घोरतच राहतात......

घर्र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्रर्र र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र र्रर्र र्र घुर्र र्र र्रघुर्र्घुर्र्घुर्
 

No comments:

Post a Comment