Saturday, 25 June 2011

आमचे ’ हे ’ रात्री अस्स्स्स्से घोरतात..


चोरी,दरोडे पडतात शेजारच्या घरी
आमच्या घरापासून चोर लांबच राहतात
अहो,पहारेकरी नाही काही दारी
आमचे हेच चोरांना पळवून लावतात

हत्यारांविना ते अशी करामत करतात
काहीच न करता , घरा उपयोगी पडतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

जसे तोफांतून दारुगोळे सुसाट सुटतात
की चोर जीव घेऊन पळतच सुटतात
पळतच सुटतात हो धुम्म पळत सुटतात
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

रातराणी फुलते मागच्या अंगणी
चंद्र चांदण्यांचे झिम्मा फुगडी गुंजतात
अहो,छळायला नसतं कुणी एकांती
आमचे हेच युध्दाची तुतारी फुंकतात

चढत्या रातींची नशा उतरवतात
काहीच न करता , मला उपयोगी नसतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

वैदूचे अंगारे,डॉक्टरचे फवारे सारेच फसतात
सारेच फसतात हो सारे उपायच फसतात

आमचे हे रात्री अस्स्स्से घोरतात
घोरतच राहतात हो घोरतच राहतात......

घर्र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्रर्र र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र र्रर्र र्र घुर्र र्र र्रघुर्र्घुर्र्घुर्
 

Friday, 24 June 2011

आजही मला ते सर्व आठवतयं

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत College कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Submission copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.......


-- 

संवाद

संवाद

टाळते आताशा मी वाट अंधाराची
नकोशी आता मज साथ चांदण्यांची ...

उगाच फाडते मी पान आठवणींची
जाळते उगाच मज याद आसवांची ...

दूर सारते मी वाट हि धुक्याची
मोकळीक हवी मज श्वास घेण्याची ...

सांडली मी झोळी अनमोल आठवांची
उरलीत मजजवळ वेदना बोचणाऱ्या काट्यांची ...

गाळली काही मी कडवी अबोल शब्दांची
करू देत मज जरा संवाद माझ्याच मनाशी ...

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

म्हणून ते प्रेम करायचे नसते,

नाही मिळाले ते परत तरी

आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

दुखवले कितीही तिने

तरी हसून तीच्या परत समोर जायचे असते,

कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने

प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

म्हणूनच नाही मिळाले परत तरी

निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते,

तूच माझी निशब्द कविता

तूच माझी निशब्द कविता.

हा पाऊस हा गारवा,
सर्वाना पसंत सारा.
त्यावर तुझे लाजने,
जसा फुलांचा वसंत सारा.


गुलाबी ओठातुन निघालेला,
शब्द तुझा,नवा पाखरू जसा.
हाय तुझे ते मधहोश डोळे,
सांग,मला मी सावरू कसा.

रस्त्यावरी रडणार्याला पाहून,
लगेच रडणारी पुण्यवान तू.
स्वतहाच्या विश्वात हरवलेली,
मानूसकित जशी बंदिवान तू.

टिकली कपाळावरची,
जशे चांदणे,डोळ्यात तुझ्या
सार्‍याच प्रश्नांची उत्तरे.
सुरेख कल्पना तू देवाची,
तुझ्यपासूनच ती सुंदराता,
तू म्हणजेच ” प्रेम खरे”.

तूच विश्व,
नि तूच प्राणिता.
निशब्द हा देव तुझ्यविणा,
तूच माझी निशब्द कविता.

खरच का ग आई

खरच का ग आई
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर
पुढचा जन्म मागतात का?

प्रत्येक सातव्या जन्मी मी
सात जन्म मागणार आहे ,
तुमच्याच पोटी येण्यासाठी मी
एक तरी तप करणार आहे………

प्रत्येक पुढचा जन्म माझी
तूच आई व्हाविस ,
अणि जन्म घेण्याआधीच मला
त्याची माहिती असावी………

तुझ बोट धरून मी
इवली पवल चालेन,
इवली इवली पावल म्हणत
प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन…..

ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
पाणी मी बघितल आहे,
पण तुला हसवान्या साठी मला
परत जन्मा घ्यायचा आहे……..


देता असता आला तर
माझ उरलेला आयुष्य दोघाना देइन,
अणि पुढचा जन्म घेई पर्यंत
तुमच्या मनामधे रहिन….

खरच आई …….

एक कॉल दिवसाला, ग्रहण लागले प्रेमाला...

एक कॉल सकाळी,
एक कॉल दुपारी...
सायंकाळच्या कॉलला,
उद्या बोलायची तयारी...

मध्ये मध्ये मेसेजचा,
खुप भडिमार होता....
आपली मनं जुळली तेव्हा,
आठवणींचा सुकाळ होता...

हळुहळु करता करता,
तीनचे कॉल दोन झाले...
लव्ह मेसेजचे रुपांतर,
कॉमेडीमध्येच झाले.....

एक कॉल दिवसाला,
ग्रहण लागले प्रेमाला...
आता तुझे मेसेजही,
लागले अक्कल शिकवायला...

आधी तुला करमत नव्हतं,
बोलल्यावाचुन रहावत नव्हतं....
नुसता मिस कॉल देणं,
तुझ्यासाठी किती सोपं होतं...

आता वेळ आणीबाणीची,
दिवसभरात कॉल नसतो....
एक फ़ालतु मेसेजसाठी,
दिवसभर ताटकळत बसतो...

जुन्या काळची आठवण आली,
करताना आज न्याहारी.....
सायंकाळच्या त्या कॉलला,
उद्या बोलायची तयारी...

आईला सांग कॉम्प्लान दे

लहानगा गंपू जंगलात फिरत असतो. 
तेवढ्यात त्याला एक साप झाडाला लटकत असलेला दिसतो. 
गंपू त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, 
'अशाने उंची नाही वाढत.... 
आईला सांग कॉम्प्लान दे!!' 

मिस्ड कॉल [विनोद]

गंपूला एक जण सारखा सारखा मिस्ड कॉल देऊन त्रास देत असतो . 
कंटाळून गंपू सिमकार्ड बदलतो 
णि 
त्याला एसएमएस करतो , 


' मी ते सिमकार्ड बंद केलं ....
 आता कसा मला मिस्ड कॉल देशील ??' 

नवरा-बायको चे भान्डण


नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. 


बायको : (रागाने) मी माझ्या आईचा सल्ला मानला असता आणि तुमच्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. 


नवरा : काय...तुझ्या आईने माझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं? 


बायको : नाही तर काय? 


नवरा : अरे देवा...आणि मी सासूबाईंना समजण्यात आतापर्यंत किती मोठी चूक करत होतो. 

दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन...

दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
पान पान आर्त आणि........ पान पान आर्त आणि ...झाड बावरुन ||धॄ||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन.
 सांजवेळी, जेव्हा येई, आठव आठव,
हो.....सांजवेळी, जेव्हा येई, आठव आठव,
दूर कुठे मंदिरात होई घंटारव,
उभा अंगावर राही, काटा सरसरुन ||१||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन.. हो..... पाखरु होऊन.

हो.....नकळत आठवणी, जसे विसरले,
नकळत आठवणी, जसे विसरले,
वाटेवर येते तसे ....ठसे उमटले,
दूर वेडेपिसे सूर ...सनई भरुन ||२||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन ..हो..... पाखरु होऊन.

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा,
हो....झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा,
आता जरी आला इथे, ऋतु वसंताचा,
ऋतु हा सुखाचा इथला ..गेला ओसरुन ||३||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन..
दिस चार झाले मन ..हो..... पाखरु होऊन.
पान पान आर्त आणि........ पान पान आर्त आणि ...झाड बावरुन ||धॄ||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन, हो............. पाखरु होऊन.


गीतः सौमित्र / किशोर कदम.
संगीत: अशोक पत्की.
गायिका: साधना सरगम.
चित्रपटः आई शप्पथ (२००६).

Monday, 13 June 2011

कोर्टातील उलटतपासणी [विनोद]


कोर्टातील अशीच एक उलटतपासणी. 


वकील : तुमच्या नोकराचं वय काय आहे? 


साक्षीदार : पंधरा ते वीस वर्षे असावे. मला नेमकं माहीत नाही.


वकील : तो तुमच्याकडं किती वर्षापासून राहतो आहे? 


साक्षीदार : गेल्या पंचवीस वर्षांपासून! 

Sunday, 12 June 2011

इलेक्टेशिअनचा विनोद

एका बाईने गंपू इलेक्टेशिअनला डोअर बेल दुरुस्त करायला बोलावलं. 
परंतु, 
गंपू चार दिवस त्यांच्या घरी गेलाच नाही.
अखेर त्या बाईंनी कंटाळून पुन्हा गंपूला फोन केला. 
गंपू वैतागून म्हणाला, 
'अहो बाई, चार दिवस तुमच्या घरी येतोय.
पण शंभरदा बेल वाजवूनही तुम्ही दरवाजा उघडत नाही म्हणजे काय?'

Friday, 10 June 2011

’जिन’का बच्चा

जत्रेत घोषणा होत असते.
' एक बच्चा खो गया है .
 जिनका है , लेके जाए .' 


गंपू तिकडे जातो आणि म्हणतो, 
 ' मला पण दाखवा ... 
देखू तो 
जिन’का 
बच्चा कैसा होता है !!' . 

सफरचंदचे गणित

प्रश्न : एका पिशवीत तीन सफरचंदं होती .
 त्यात आणखी दोन सफरचंदं ठेवली तर काय होईल ? 


उत्तर : तिसरीच्या गणित विषयासाठी एक प्रश्न !!!

भुतचा थरथराट [विनोद]

एक भूत मध्यरात्री १२ वाजता दुसऱ्या भुताला म्हणालं, 
उगाच थरथर कापू नकोस. 
वेड्यासारखं घाबरू नकोस.
 हे सगळे मनाचे खेळ असतात. 
नीकां नीकां सं गा काही तं. 

एवढं मोठं घर माझं [विनोद]

नंदू : अरे, माझं घर इतकं मोठं आहे की एखादी लोकल ट्रेन त्यात सहज फिरु शकते. 


चंदू : ह्यॅ...हे तर काहीच नाही. माझं घर एवढं मोठं आहे की एका कोपऱ्यातून दुसरीकडे फोन करायचा झाल्यास रोमिंग चार्ज लागतो. 

Wednesday, 1 June 2011

प्रेम माझे तू आहेस

प्रेम माझे तू आहेस ,
प्रेयसी ही तूच आहेस ,
साथ माझी तू आहेस ,
वेड माझे तूच आहेस ...

तूच माझे बोल ,
माझी कविता तूच आहेस ,
तूच माझे शब्द ,
वाक्य माझे तूच आहेस ...

रात्र माझी तू आहेस ,
दिवस माझा तू आहेस ,
तूच इन्द्रधनुष्य माझा ,
पावसातही तूच आहेस ...

देव माझा तू आहेस ,
धर्म देखिल तूच आहेस ,
भाव माझे तू आहेस ,
भवनांतही तूच आहेस ..